नमस्कार! माझे नाव गणेश महादेव जोशी. मी ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात गेली ३५ वर्षे राहतो. उच्च माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण करुन श्री क्षेत्र आळंदी येथे पौरोहित्यासाठी लागणारे शिक्षण घेतले. तिथे पुरुषसूक्त, विष्णूसूक्त, श्रीसूक्त, रुद्रसूक्त, रुद्राध्याय, पंचसूक्त पवमान इत्यादी प्रकारची काही सूक्ते, उदकशांत, निधनशांत, वास्तुशांत तसेच विविध प्रकारच्या शांतींचे मंत्र, सर्व प्रकारच्या पूजा, विवाह व उपनयन इत्यादी विधी व मंत्र शिकलो.
गेल्या वीस वर्षांच्या अनुभवातून मी पौरोहित्याचे काम करत आहे. आई-वडील दोघांच्या घरी वंशपरंपरागत पौरोहित्य आणि ज्योतिष घराणे चालत आल्यामुळे सहाजिकच मला ती गोडी आणि कला अवगत झाली.
त्यानंतर मुंबई येथे २००४ ते २००८ या दरम्याने पारंपारिक ज्योतिषशास्त्र शिकलो. पारंपारिक ज्योतिष शास्त्रातील लुप्त पावलेल्या कित्येक बाबींचे संशोधन करून त्याची ज्योतिषशास्त्राशी धर्मशास्त्रे व पुराणे यांच्याशी सांगड कशी घालावी याचे ज्ञान आम्हाला शिकवले गेले. आई-वडील, पूर्वज आणि गुरूंच्या आशीर्वादामुळेच माझे ज्योतिष शिकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
गुरूंच्या आज्ञेनुसार मी लोकांच्या पत्रिका बघून भविष्य कथन करून उपाय सांगण्यास सुरुवात केली. त्यानुसार गेली १२ वर्षे ज्योतिष मार्गदर्शनाचा अनुभव माझ्याजवळ आहे. जातकांची पत्रिका बघून सांगितलेले उपाय केल्यानंतर बहुतांश जणांना सकारात्मक अनुभव आले आहेत ही ज्योतिष शास्त्राची व ज्योतिषशास्त्र निर्मिती करणाऱ्या ऋषींची कृपाच आहे.
Jyotish Pandit