पंचायतन पूजा

gemstones

शिव पंचायतन

भगवान शिव ही हिंदू धर्मातील एक मुख्य देवता आहे. त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णु, महेश यांपैकी महेश म्हणजेच भगवान शिव आहेत. शिव हे जगताचे आदि, मध्य आणि अंत आहेत अशी मान्यता आहे. 'शं करोति इति शंकर:' म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय.

शिव पंचायतनामध्ये भगवान शंकर मध्यभागी तसेच चार बाजूला अनुक्रमे विष्णू, गणेश, सूर्य, देवी असा क्रम आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सप्तऋषींना भगवान शिवांनी प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते. शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. 'रूद्र' हे शंकराचे वेदातील नाव आहे. भगवान विष्णूंनी सृष्टीची निर्मिती केली व तिचे कल्याण हे शिव शंकर करत आहेत. ब्रह्मदेव हे सृष्टी चालवत आहेत. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरण चक्राची रूपके आहेत.

भगवान शिवांच्या अनेक रुपांमधे उमा- महेश्वर, अर्धनारीनटेश्वर, पशुपति, कृत्तिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रुपे प्रसिद्ध आहेत. भगवान शिव हे एक योगी मानले जातात आणि त्यांची पूजा लिंग स्वरुपात केली जाते. शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत तसेच अशी भरपूर प्रमाणात शिवलिंगे या भूमीवर सर्वत्र पसरलेली आहेत.

भगवान शिव यांचे कुटुंब खूप मोठे आहे. गणपती व कार्तिकेय हे त्यांचे पुत्र तसेच अशोक सुंदरी त्यांची पुत्री मानले जातात. माता पार्वती या त्यांच्या पत्नीसह ते कैलास पर्वतावर वास्तव्य करतात. जगाच्या अंताच्या वेळी (प्रलय) शिव हे सृष्टीचे तारणहार आहेत असे मानले जाते. भगवान शिव व त्यांच्या स्वरुपातील देवतांच्या धार्मिक कार्यासाठी केल्या जाणाऱ्या पूजा खालीलप्रमाणे आहेत.

लघुरुद्र अभिषेक पूजा, महारुद्र अभिषेक पूजा, अतिरुद्र अभिषेक पूजा, प्रदोष व्रत पूजा, शिवमहिम्न स्तोत्र पठण, शिवलीलामृत अध्याय कथा वाचन, महाशिवरात्री पूजा, श्रावण सोमवार पूजा, शिवकवच स्तोत्र पठण, शिवामूठ पूजा, सोळा सोमवार व्रत पूजा, मल्हारी मार्तंड नवरात्री पूजा, कालभैरवाष्टक स्तोत्र पठण, शिवपूजन.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download