शारदीय नवरात्र

gemstones

शारदीय नवरात्र

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित एक व्रत आहे. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी आणि शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.

दुर्गादेवीच्या उपासनेसाठी नवरात्र हे अत्यंत शुभ व महत्त्वाचे मानले गेले आहे. काही धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार शारदीय नवरात्राचे महत्त्व विशेष करून सांगण्यात आले आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणून याला शारदीय असे नाव पडले. पूर्वी ऋषिमुनींनी बल संवर्धनार्थ याच शारदीय नवरात्रात दुर्गेची आराधना केली असे म्हटले जाते. या नवरात्रामध्ये भारतात सर्वत्र प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा, आराधना सप्तशती पाठ, होम-हवन, कुंकुमार्चन, उत्सव इत्यादी धार्मिक कृत्ये घडतात. दुर्गादेवीचे माहात्म्य भविष्यपुराणात कथन केलेले आढळते.

अशा प्रकारे जो कोणी भक्त या नवरात्रामध्ये देवीची मनापासून उपासना करेल त्याला कोणतीही बाधा होणार नाही आणि या जन्मात त्याला धनधान्याची कमी पडणार नाही.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download