सूर्य पंचायतन

gemstones

सूर्य पंचायतन

सूर्य हा संपूर्ण जगाचा आत्मा आहे. अतिप्राचीन काळापासून आपल्याकडे सूर्याची उपासना केली जात आहे. ग्रहमालेचा हा राजा असून पंचायतनामध्ये सूर्याला विशेष असे स्थान देण्यात आले आहे. सूर्य पंचायतनात सूर्य मध्यभागी, ईशान्य कोपऱ्यात शिव, आग्नेय कोपऱ्यात गणेश, नैऋत्य कोपऱ्यात विष्णू आणि वायव्य कोपऱ्यात देवी अशी स्थापना करतात.

पूर्वी सूर्यपूजा ही मंत्रांनी केली जात असे. नंतर मूर्तीपूजा अस्तित्वात आली आणि ती लोकप्रिय झाली म्हणून सर्वत्र विविध देवतांची मंदिरे बांधली गेली त्याप्रमाणेच सूर्य मंदिरेसुद्धा बांधली गेली. केवळ वैदिक साहित्यातच नव्हे तर आयुर्वेद, ज्योतिष, हस्तरेषा शास्त्रातही सूर्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पंचायतनामधील सूर्य हा असा एकमेव देव आहे जो आपण साध्या डोळ्यांनी बघू शकतो.

पौराणिक संदर्भात सूर्याच्या अस्तित्वाचे बरेच संदर्भ आहेत. भगवान सूर्य हे महर्षि कश्यप ऋषी व त्यांच्या पत्नी माता आदिती यांचे पुत्र असल्याने त्यांचे एक नाव आदित्य असेही आहे. सूर्य देवाच्या दोन पत्न्या आहेत. संज्ञा व छाया. संज्ञा या पत्नीपासून वैवस्वत मनु, यमराज आणि यमुना अशी मुले आहेत तसेच छाया या पत्नीपासून भगवान शनैश्चर, सावर्णि मनु व तपती अशी मुले आहेत. भगवान सूर्याच्या परिवाराची सविस्तर कथा मत्स्य पुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण आणि मार्कंडेय पुराणामधे सांगितली आहे. भगवान सूर्याला उद्देशून करण्यात येणारी धार्मिक कार्ये खालील प्रमाणे आहेत-
सूर्य अथर्वशीर्ष जप, सूर्य जप, सौरसुक्त जप, सूर्यपूजा, आदित्यहृदय स्तोत्र जप, मकरसंक्रांती पूजा, रथसप्तमी पूजा.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download