ज्योतिष विद्येचा उगम

ज्योतिष विद्येचा उगम

ज्योतिष हे हिंदूंचे प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे.
संपूर्ण सृष्टी ही परमेश्वराने निर्माण केली. त्यामध्ये असंख्य जीवजंतू, मनुष्यप्राणी, मोठमोठे तपस्वी, ऋषिमुनी, राजे-महाराजे, ग्रह, तारे यांची निर्मिती केली तसेच त्यांना एक विशिष्ट कार्य दिले. ऋषिमुनी हे त्यांपैकीच एक… पण ते साक्षात परमेश्वराचा अंश होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आकाशात रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे चमकताना ऋषीमुनींना दिसले. या दिव्यांना ‘ज्योति’ अशी संज्ञा दिली गेली. पृथ्वीवरून विचार करता या ज्योतिंचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो का याचा त्यांनी अभ्यास केला. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते तसेच इतरही काही ग्रह फिरतात आणि त्यांच्या विशिष्ट फिरण्याच्या कालमानानुसार किंवा वर्तनानुसार त्याचा होणारा मानवी जीवनावर परिणाम, वास्तवात होत असलेला परिणाम आणि भविष्यात होणारे परिणाम यांचे अंदाज किंवा आडाखे बांधण्याची प्रक्रिया ऋषिमुनींना अवगत झाली. याप्रमाणे अनेक वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी काही निष्कर्ष काढले. या सर्व प्रकाराला ऋषिमुनींनी 'ज्योतिष' अशी संज्ञा दिली.
मानवाच्या जन्म वेळेची आकाशातील ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम मानवाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच 'ज्योतिषशास्त्र' असा शोध ऋषिमुनींना लागला. असा ज्योतिषविद्येचा उगम झाला.

अशी बरीच वर्षे निरीक्षण करून ते या निष्कर्षापर्यंत आले, की काही भविष्यांच्या घडामोडींचा वेध हा ग्रहताऱ्यांच्या फिरण्यामुळे किंवा त्यांच्या असण्याने पृथ्वीवर काही परिणाम घडत असतो, असाच काहीसा परिणाम मानवी जीवनावर पण होतो. असे अजून खोलवर संशोधन करत करत ऋषिमुनींनी त्यांचे असंख्य शिष्यगण बनवले, त्यानुसार त्यांचा वारसा घेत काहीजण तसा ज्योतिषाचा अभ्यास करून भविष्यकथन करतात.

gemstones

ज्योतिषाचे प्रकार

भविष्यकाळामध्ये काय घडणार आहे याचा शोध घेणे म्हणजेच ‘ज्योतिष’ होय.

ज्योतिषाच्या कुंडली शास्त्राचे दोन विभाग आहेत. १) पारंपारिक पद्धत २) कृष्णमूर्ती पद्धत.

पारंपारिक ज्योतिष पद्धतीमधे ग्रहांच्या गुणधर्मांना महत्त्व दिले जाते आणि कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत नक्षत्र गणनेवर आधारित आहे. त्याशिवाय ज्योतिष बघण्याचे असंख्य प्रकार आहेत. हस्तसामुद्रीक म्हणजेच हातावरच्या रेषा, पादसामुद्रीक म्हणजे पायावरच्या रेषा, शरीरलक्षणे म्हणजे अंगावरचे असलेले तीळ किंवा कमी जास्त असलेली अवयवांची ठेवण यांवरून तसेच चेहरा वाचन माध्यमातून ज्योतिष कथन करणारे आहेत. सही किंवा अक्षर वाचन, Aura म्हणजे आपल्या शरीरातून निघणारा एक प्रकाश असतो त्या प्रकाशाचे पृथक्करण करून त्यावरुन ज्योतिष कथन करतात. म्हणजेच लोलक विद्या, चुंबकीय विद्या यांचा वापर करून भविष्यकथन करणे. रमल म्हणजे एक प्रकारचे फासे किंवा कवड्या वापरून भविष्यकथन केले जाते. काही लोक कवड्यांऐवजी तांदूळ, असोला भात, साळीचे दाणे किंवा गहू वापरतात. Tarrot Card नावाचा एक प्रकार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे असतात. त्यापैकी कोणते चिन्ह त्या विशिष्ट परिस्थितीमधे जातकाने काढले किंवा कोणत्या चिन्हाची निवड केली त्यावरून त्याचे अंदाज बांधले जातात. अशा वेगवेगळ्या रीतीने भविष्य सांगितले जाते. यापेक्षा अजून अनेक पद्धती आहेत ज्यांच्या सहाय्याने भविष्यात काय घडेल यांचे अंदाज किंवा अनुमान वर्तवण्याची पद्धत आलेली आहे.

ज्योतिषाद्वारे केले जाणारे भाकीत व त्याची सत्यता

ज्योतिषांना भविष्य समजते का? या जगात सर्व माणसांचे जे काही होऊन गेलेले असते किंवा पुढे काय होणार आहे ते ज्योतिषाद्वारे सांगता येऊ शकते का? प्रत्येक ज्योतिषी तीच पत्रिका बघून वेगवेगळी भाकिते का करतात? याचा अर्थ ज्योतिषशास्त्र चुकीचे आहे की ज्योतिषी चुकत आहेत? या सगळ्यांचे उत्तर पुढील प्रमाणे-
प्रत्येक ज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या भाग्यामध्ये उत्तम भविष्यकथन करण्याचा योग आहे की नाही याच्यावर सर्वकाही भविष्यकथन अवलंबून आहे. जी व्यक्ती दुसऱ्याचे भविष्य सांगणार आहे त्या व्यक्तीला भविष्यकथन करण्यासाठी लागणारी ग्रहस्थिती म्हणा किंवा ती अनुकूलता आहे की नाही याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. त्या ज्योतिषाने कोणाकडून ज्योतिष विद्येचे शिक्षण घेतले तसेच त्याच्या गुरूंची शिकवण्याची पद्धत याने कशी आत्मसात केली यावर अवलंबून असते. त्याची साधना किती आहे, अभ्यास किती सखोल आहे आणि वेध घेण्याची पद्धत किती अचूक आहे त्याप्रमाणे त्याचे भविष्यकथन वा भाकीत किती सत्य आणि उत्तम आहे ते ठरते.
प्रत्येक ज्योतिषविषयक सल्ल्याचा परिणाम हा जातकाच्या श्रद्धेनुसार व त्याच्या आचरणानुसार मिळतो.

आपल्या सर्व समस्यांचे निराकरण पारंपारिक ज्योतिष पद्धती नुसार कुंडली पाहून केले जाईल.

Call On : +91 8355807266

  • Download
  • Download