प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते की आपली स्वतःची जमीन असावी. नंतर त्या जमिनीवर स्वतःचे घर, इमारत किंवा तत्संबंधी काही बांधकाम केले जाते, परंतु ते बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या भूमीचे पूजन होणे अत्यावश्यक असते.
पृथ्वीला आपण ‘धरणीमाता’ मानतो. तिच्या पाठीवर कोणतेही बांधकाम करत असताना तिला त्रास होईल अशी भावना मनामध्ये धरून पृथ्वीची क्षमायाचना केली जाते. पृथ्वीला तोलून धरणाऱ्या अनंत आणि कूर्म यांचे आशीर्वाद घेऊन जी हत्यारे वापरावयाची असतात त्यांचे पूजन करून ज्या प्रकारचे बांधकाम करावयाचे आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अशी प्रार्थना करून भूमीचे पूजन केले जाते.