भारतात मूर्ती पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आणि मूर्तीपूजा परस्पर पूरक गोष्टी आहेत. जेव्हा एखाद्या देवाबद्दल मनातून आस्था, श्रद्धा असते तेव्हा त्याचे प्रतिरूप म्हणून जी प्रतिमा असते ती म्हणजे मूर्ती.
नुसती मूर्ती स्थापित केली म्हणजे तिला देवत्व प्राप्त होत नाही तर तिच्यात चेतन आत्मा यावा म्हणून वैदिक शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चाराने मूर्तीमध्ये आत्मा समाविष्ट करणे म्हणजे प्राणप्रतिष्ठा होय.